सर्वात आधी त्यांनीच करून त्याला लॅकोलाइट [→ लॅकोलिथ] हे नावही दिले. यासंबंधीचात्यांचा जिऑलॉजी ऑफ हेन्री मौटन्स हा अहवाल महत्त्वाचा आहे. सन १८७९ — १९१८ या दरम्यान ते युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेत होते. ते अॅपालॅचिअन विभागाचे प्रमुख (१८८४) व प्रमुख भूवैज्ञानिक (१८८९ — ९२) होते. प्राचीन सरोवर बॉनव्हिल आणि नायगारा नदी व धबधबा यांच्या संशोधनासंबंधीची त्यांची बॉनव्हिल मोनोग्राफ आणि हिस्टरी ऑफ नायगारा रिव्हर ही पुस्तके १८९० साली प्रसिद्ध झाली. त्यांनी रॉकी पर्वताच्या भागातील प्रदेशाचे नकाशे काढले व त्याचे भूवैज्ञानिक वर्णनही केले. अशा तऱ्हेने भूवैज्ञानिक संरचना व भूपृष्ठाचे स्वरूप यांच्यातील संबंधाचे प्रथम अध्ययन करणाऱ्यांपैकी ते एक होत. महासरोवरांच्या भागातील भूकवचाच्या हालचाली व सिएरा नेवाडा या भागाचे भू-आकारविज्ञान (भूमीच्या स्वरूपांची वैशिष्ट्ये, उत्पत्ती व उत्क्रांती यांचा अभ्यास करणारे शास्त्र) यासंबंधीचे त्यांचे अध्ययन महत्त्वाचे आहे. त्यांनी हिमनदी व हिमानी क्रिया यांविषयीही संशोधन केले. हिमानी क्रियेने तयार होणाऱ्या U अशा आकाराच्या दरीला ‘हँगिंग व्हॅली’ हे नाव त्यांनीच दिले.
अॅकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासद होते. त्यांनी अमेरिकन असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्सेसचे अध्यक्षस्थान एकदा व अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सोसायटीचे अध्यक्षस्थान दोनदा भूषविले होते. १९०० साली लंडनच्या जिऑलॉजिकल सोसायटीने त्यांना वुलस्टन पदक अर्पण केले. ते जॅक्सन (मिशिगन) येथे मृत्यु पावले.
